Ladki Bahin Yojana eKYC Edit: नविन ऑप्शन आले, लगेच करा ई-केवायसी सुधारना, 31 मार्च शेवटची तारीख

Ladki Bahin Yojana eKYC Edit: महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. eKYC करण्यासाठी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर नवीन लिंक सक्रिय करण्यात आली आहे. मात्र ही सुविधा फक्त त्या महिलांसाठी आहे ज्यांच्या केवायसीमध्ये आधी काही त्रुटी झाल्या होत्या. योग्य माहिती अद्ययावत करून लाभार्थी महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळावा हा या निर्णयाचा उद्देश आहे.

महिला व बाल विकास विभागाने पात्र व अपात्र लाभार्थ्यांची छाननी करण्यासाठी योजनेचा लाभ घेत असलेल्या सुमारे 2 कोटी 47 लाख महिलांसाठी केवायसी अनिवार्य केली होती. परंतु अनेक महिलांकडे आवश्यक कागदपत्रे नसणे, आधारशी लिंक मोबाईलवर OTP न मिळणे किंवा चुकीचे पर्याय निवडणे यामुळे मोठ्या प्रमाणावर ई-केवायसीमध्ये चुका झाल्या.

केवायसी अयशस्वी झाल्यामुळे हजारो महिलांना योजनेची मासिक मदत मिळणे बंद झाले. त्यामुळे राज्य सरकारने दुरुस्ती करण्यासाठी पोर्टलवर पुन्हा नवीन लिंक सुरू केली आहे. या लिंकद्वारे महिलांना आपली माहिती सुधारता येणार आहे. तुम्हालाही Ladki Bahin Yojana eKYC Edit करायची असल्यास हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Ladki Bahin Yojana eKYC Edit Overview

योजना नाव – Ladki Bahin Yojana
लाभ – महिलांना दरमहा ₹1500
सुरू करणारे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सुरुवात – महाराष्ट्र अंतरिम बजेट 2024
लाभार्थी – महाराष्ट्रातील महिला
वयोमर्यादा – 21 ते 65 वर्ष
उद्देश – महिला सक्षमीकरण
प्रक्रिया – ऑनलाइन / ऑफलाइन
अधिकृत संकेतस्थळ – ladakibahin.maharashtra.gov.in

Ladki Bahin Yojana eKYC Edit

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, निराश्रित, परित्यक्ता तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिलेला दरमहा ₹1500 आर्थिक मदत दिली जाते. मात्र काही अपात्र महिलांनीही योजनेचा लाभ घेतल्याने गरजू महिलांना संधी मिळू शकली नाही.

अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली. पण कागदपत्रांच्या अडचणी, OTP समस्या आणि चुकीची माहिती भरल्यामुळे अनेक महिलांची केवायसी पूर्ण होऊ शकली नाही. म्हणून महिला व बाल विकास विभागाने 26 मार्च 2026 पर्यंत eKYC Edit करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेद्वारे महिलांना पुन्हा योजनेत सहभागी होता येईल.

लाडकी बहिण योजना ई-केवायसी एडिटसाठी पात्रता

  • महाराष्ट्र राज्यातील महिला पात्र असतील.
  • महिलेचे वय 21 ते 65 वर्ष असावे.
  • बँक खाते आधारशी लिंक व DBT सक्रिय असणे आवश्यक.
  • कुटुंबात ट्रॅक्टर वगळता इतर चारचाकी वाहन नसावे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादेत असावे.
  • फक्त आधी केवायसी केलेल्या पण चूक झालेल्या महिलांनाच एडिट करता येईल.
  • विवाहित, विधवा, निराश्रित, परित्यक्ता व कुटुंबातील एक अविवाहित महिला पात्र.

Ladki Bahin Yojana eKYC Edit कशी करावी

  • सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • होमपेजवर दिलेल्या eKYC Edit लिंकवर क्लिक करा.
  • आधार क्रमांक व कॅप्चा भरून “मी सहमत आहे” निवडा.
  • “ओटीपी पाठवा” बटणावर क्लिक करा.
  • आधारशी लिंक मोबाईलवर आलेला OTP टाका.
  • त्यानंतर eKYC Edit पेज उघडेल, तेथे योग्य पर्याय निवडा.
  • A) कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत कार्यरत – “नाही” निवडा.
  • B) निवृत्तिवेतन घेत असल्यास – “नाही” निवडा.
  • शेवटी टिक बॉक्स निवडून “सबमिट करा” बटण दाबा.
  • अशा प्रकारे केवायसी दुरुस्ती पूर्ण होईल.

महत्त्वाची सूचना

केवायसी दुरुस्त केल्यानंतर थांबलेली मदत पुन्हा सुरू होईल. यासाठी बँक खाते आधारशी लिंक व DBT सक्रिय असणे गरजेचे आहे. तरीही लाभ न मिळाल्यास हेल्पलाइन 181 वर संपर्क साधता येईल.

Ladki Bahin Yojana eKYC Edit FAQ

eKYC एडिट लिंक:

https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc

Ladki Bahin Yojana eKYC Edit शेवटची तारीख

31 मार्च 2026 पर्यंत केवायसीमध्ये सुधार करता येईल. ही संधी फक्त आधी चूक झालेल्या महिलांसाठी आहे.

Leave a Comment